Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

पुण्यात लग्नासाठी तरुणीने केले तरुणाचे अपहरण

अपहरणाचा चार तासांत छडा, ७, जणांना अटक

marathinews24.com

पुणे – लग्नासाठी तरुणीने सुपारी देऊन तरुणाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मात्र, पुणे पोलिसांच्या टीम वर्कमुळे अवघ्या चार तासांत अपहरण नाट्याचा पर्दापाश करीत ७ जणांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी ( दि. २७) रात्री साडे नऊ वाजता घडली आहे. निलेश लक्ष्मण बोद्रे (वय २९, रा. शिंदेवाडी, ता. हवेली) असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

वाहन धडकेचा वाद; दाम्पत्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी – सविस्तर बातमी

सुदाम माणिक ताठे (रा. वजुर, ता. पूर्णा, जि. परभणी) शेख सोहेल शेख अफसर (रा. वालूर, ता. सेलू, जि. परभणी) देवीदास भगवान पांजगे (रा. प्रसादनगर, परभणी) वैभव मिलिंद शेळके (रा. गंगाखेड रोड, परभणी) सारंग भगवानराव काकडे (रा. आष्टूर, ता. लोहा, जि. नांदेड) प्रसाद बंडू गवळी (रा. प्रसादनगर, परभणी)
सोनाली बालाजी निर्वाळ (रा. भाग्यनगर, परभणी) यांना अटक केले आहे. आरोपीविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला बुधवारी (दि. २७) रात्री सव्वा नऊ वाजता अजय लक्ष्मण बोद्रे यांनी फोन करून त्यांच्या भावाचे एच. पी. पेट्रोल पंपाजवळून कारमधून अपहरण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी तत्काळ तपास पथके रवाना केली. प्राथमिक तपासात निलेश लक्ष्मण बोद्रे (वय २९ ) यांना आरोपींनी मारहाण करून जबरदस्तीने वाहनात बसवून अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धाव घेतली. तपासासाठी लोणीकंद पोलीस आणि गुन्हे शाखेची पाच स्वतंत्र पथके तयार केली.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण करून बीड, नांदेड, परभणी पोलिसांच्या मदतीने आरोपींना माजलगाव (बीड) याठिकाणी ताब्यात घेण्यात आले. तपासात आरोपी सोनाली बालाजी निर्वाळ (वय २७, रा. भाग्यनगर, परभणी) हिने निलेश बोद्रे यांच्याशी जबरदस्तीने विवाह करण्याच्या उद्देशाने आरोपींसोबत संगनमत करून अपहरण केल्याचे उघड झाले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त गैाहर हसन, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, एलसीबी बीडचे शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर, एपीआय विजया वंजारी, उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, तुकाराम सुरवसे, मकाने, स्वप्नील जाधव, कैलास साळुंखे, सागर जगताप, रितेश काळे, संतोष अंदुरे, मल्लारी सपुरे, शुभम चिंनके, सुधीर शिवले, दिनेश मरकड, अशोक शेळके, तुषार पवार, प्रियांका पानसरे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×