Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वाहन धडकेचा वाद; दाम्पत्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वाहन धडकल्याने किरकोळ कारणावरून झालेला वाद थेट मारहाणीसह जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २६) घडली. तीन वर्षांच्या मुलासमोर दाम्पत्याला मारहाण करण्यात आल्याप्रकरणी वाघोली पोलिसांनी कारमधील चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत मुंगसे असे आरोपीचे नाव असल्याची माहिती सुत्रांनी दिली. प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी आरोपींची नावे देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी शांतनू निरंजन शुक्ला (वय ३५, रा. मॅजेस्टिक सिटी, वाघोली) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मुंबईच्या पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खासगी कंपनीत अभियंता आहेत. ते बुधवारी पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलासह एका मॉलमध्ये खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत होते. सोयरीक गार्डन चौकातून वळण घेताना भरधाव आलेल्या पांढऱ्या रंगाच्या वॅगेनार कारने त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे शुक्ला यांनी ‘गाडी हळू चालवा’ असे सांगितल्याने संतप्त झालेल्या कार चालकाने शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेत तीन वर्षांचा मुलगा अत्यंत भयभीत झाल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून दिसून आले. तो घाबरून हात जोडून जोरजोराने रडत होता. या घटनेमुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी वाघोली पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, वाघोली परिसरात वाढत्या वाहन धारकांच्या बेफिकीर वर्तनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांमुळे पोलिसांचा धाक कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×