Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

मुंबईच्या पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

गुन्हा दाखल होऊनही आरोपी फरार

marathinews24.com

पुणे – शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तरुणाची तरुणीसोबत ॲपद्वारे ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन लग्न करण्याचे त्याने आश्वासन दिले. पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर सलग दोन वर्षे तरुणीला टाळाटाळ करून तिच्याशी लग्न न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी पोलिस उपनिरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने पीडिता गर्भवती राहिली. नोकरी लागल्यावर आपण लग्न करू असे म्हणत त्याने पीडितेला गर्भपात करण्यास भाग पाडले.

हडपसरमध्ये अल्पवयीनावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक – सविस्तर बातमी

तरुणीच्या तक्रारीवरून आता उपनिरीक्षक झालेल्या तरुणावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन १० दिवस उलटले तरी पोलिसांनी आरोपीला अटक न केल्याने पीडितेने पोलिसांविषयी रोष व्यक्त करत त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. स्वदेश विजय चव्हाण (वय ३१) असे गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात ३१ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे.

स्वदेश व पीडित तरुणी पुण्यातील वारजे माळवाडी भागात राहण्यास होते. पीडिता बँकेत क्लर्क म्हणून नोकरीला आहे. तर, स्वदेश हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. स्वदेश आणि तिची ओळख एका ॲपद्वारे झाली होती. स्वदेशने तिला लग्न करू असे सांगितले होते. पीडिता गर्भवती राहिली असता स्वदेशने तिचा गर्भपात केला.

दरम्यान, नुकतीच स्वदेशची स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबई पोलिस दलातील कुरार पोलिस ठाणे, मालाड येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.

नोकरी लागल्यानंतर पीडितेने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. मार्च २०२६ मध्ये स्वदेशने तरुणीला लग्नास नकार दिला. त्यानंतर फसवणूक झाल्यावरून तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, १० दिवस उलटूनही पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने वारजे माळवाडी पोलिसांच्या कामकाजावर शंका उपस्थित केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×