Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

हडपसरमध्ये अल्पवयीनावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

रस्ता काँक्रिटीकरण करणार्‍या मजुरावर वार

हडपसरमधील पांढरे मळा परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – अंगणात खेळत बसलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर वार करून टोळक्याने त्याला गंभीररित्या जखमी केले आहे. हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून, याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना २६ मे रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील पांढरे मळा परिसरात घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीनाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

तंबाखूवरुन येरवडा कारागृहात कैद्याला मारहाण – सविस्तर बातमी 

भावेश उर्फ सुधाकर सोनवणे (वय १८ रा. पांढरे मळा, हडपसर) राजा विजय शर्मा (वय २०) अनिश नीलेश जॉन (वय १८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या साथीदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगा २६ मे रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घराच्या अंगणात बसला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला गाठून हत्याराने वार करून गंभीररित्या जखमी केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीनाला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ तिघांना अटक केली असून, इतराचा शोध सुरू केला आहे. हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून, पोलीस तपास करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक अमोल मांडवे तपास करीत आहेत.

टास्कच्या जाळ्यात अडकवून ७ लाखांना लुटले

पुणे – टेलीग्रामद्वारे संपर्क साधून सायबर चोरट्यांनी तरूणाला टास्कचे आमिष दाखवले. त्यासाठी लिंक पाठवून टास्क पुर्ण करण्यास सांगून सायबर चोरट्यांनी तरूणाला ६ लाख ८० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १७ ते २६ जुलै २०२५ कालावधीत शिवदर्शन पुर्ण याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी तरूणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पर्वती परिसरातील शिवदर्शनमध्ये राहायला असून, १७ जुलै २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी टेलीग्रामद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. लिंक पाठवून टास्क पुर्ण केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने टास्क पुर्ण केला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना गुंतवणूकीला भाग पाडले. अवघ्या ९ दिवसांत तब्बल ६ लाख ८० हजार रूपये तक्रारदाराने गुंतवले. मात्र, त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×