Breking News
पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासापुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

तंबाखूवरुन येरवडा कारागृहात कैद्याला मारहाण

हडपसरमध्ये अल्पवयीनावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – तंबाखू मागण्यावरुन येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये वाद झाला. दाेन कैद्यांनी एकाला मारहाण केली. कैद्याला मारहाण केल्याप्रकरणी दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय शंकर राठोड, संतोष सुरेश भालेराव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहे. याबाबत वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोथरूडमध्ये भरदिवसा घरफोडी; २ लाखांचा मुद्देमाल चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक दोन परिसरातील बराकीच्या परिसरात स्वच्छतागृह आहे. बुधवारी (२७ मे) सकाळी सातच्या सुमारास प्रसाधनगृहाच्या परिसरातील हौदाजवळ कैदी शुभम पोखरकर थांबला होता. तो स्वच्छतागृहात जात असताना राठोड आणि भालेराव यांनी पोखरकर याला अडवून तंबाखू मागितली. तंबाखूवरुन दोघानी वाद घालून जेवण वाढण्यासाठी वापरले जाणारे छोटे माप आणि प्लास्टिकची बादली पोखरकर याच्या डोक्यात मारली. पोखरकर जखमी झाला. कैद्यांमधील हाणामारीचा प्रकार पाहून कारागृहातील रक्षकांनी तेथे धाव घेतली. राठोड आणि भालेराव यांना ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे तपास करत आहेत.

येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. हाणामारीच्या घटना, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी कारागृहाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×