Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कोथरूडमध्ये भरदिवसा घरफोडी; २ लाखांचा मुद्देमाल चोरी

वडिलांना मारहाण केल्याने तरुणाचा केला खून

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड, तसेच लॅपटाॅप असा १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना कोथरूड भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रसिध्द रील स्टार रोहिणी पाराध्ये यांची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पौड रस्त्यावरील शीलाविहार काॅलनीतील एका सोसायटीत राहायल आहेत. बुधवारी (२७ मे) सकाळी दहाच्या सुमारास तक्रारदार आणि कुटुंबीय हे कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड, तसेच लॅपटाॅप असा मुद्देमाल लांबवून चोरटे पसार झाले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तक्रारदार कामावरुन परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस हवालदार दगडे तपास करत आहेत.

तरुणाच्या डोक्यात गज मारून मोबाइल हिसकावला

शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धनकवडीत २५ लाखांची रोकड लूट, तसेच बिबवेवाडीत डिलिव्हरी बाॅयला लुटण्याच्या घटना ताज्या असतानाच कात्रज-कोंढवा रस्त्यावर पादचारी तरुणाच्या डोक्यात गज घालून दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कात्रज परिसरातील एका सोसायटीत राहायला आहे. २४ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तरुण दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडला. कात्रज-कोंढवा रस्त्यावर माऊलीनगर बस थांब्याजवळ दुुचाकीवरुन आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्याला अडवून पैशांची मागणी केली. तरुणाने नकार दिल्यानंतर चोरट्यांनी शिवीगाळ केली. तरुणाच्या डोक्यात गज घातला. गज घातल्याने तरुण जखमी झाला. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या हातातील दहा हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासलेे असून, सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×