Breking News
Pune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढा

वजनावरून टोमणे, उपाशी ठेवत महिलेचा केला छळ

पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग

सासरच्या चौघांविरुद्ध तक्रार

marathinews24.com

पुणे – महिलेला वजनावरून सतत टोमणे मारणे, वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यास दबाव टाकणे, तसेच दिवसभर उपाशी ठेवून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी कॅम्प परिसरातील एका विवाहितेने पतीसह चौघांविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

पुण्यातील पोर्शे अपघातातील आरोपींचा डान्स व्हायरल- सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत विवाहितेला सासरी वारंवार त्रास दिला जात होता. तिच्या वजनावरून सतत टोमणे मारत “वजन कमी करण्यासाठी ऑपरेशन कर” तसेच “त्याचा खर्च तुझ्या वडिलांनी करावा” असे सांगून वाद घातले जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदार महिलेला अनेकदा घरात एकटे ठेवून खाण्यासाठी काहीही न देणे, तिच्याशी क्रूरपणे वागणे तसेच मानसिक दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पतीने वेळोवेळी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय सासू आणि नणंदेकडूनही मारहाण करून माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली जात होती. सततच्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास लष्कर पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×