Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

गोंधळेनगरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

ट्रक चालकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील गोंधळेनगर परिसरात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महादेव शांताराम गिरी (वय ५०,रा. काळेपडळ, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात गिरी यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जयश्री महादेव गिरी (वय ४०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील सराफी पेढीतून अंगठी चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार महादेव, त्यांची पत्नी जयश्री आणि मुलगा हे १३ ऑगस्टला रात्री नऊच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्याने निघाले होते. हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार महादेव, त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले. दुचाकीवरुन बाजूला फेकल्या गेल्याने जयश्री यांना दुखापत झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महादेव, त्यांचा मुलगा, तसेच जयश्री यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच महादेव यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया कोलेवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×