Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

लक्ष्मी रस्त्यावरील सराफी पेढीतून अंगठी चोरीला

लक्ष्मी रस्त्यावरील सराफी पेढीतून अंगठी चोरीला

चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती लक्ष्मी रस्त्यावरील सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्याने ४० हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत सराफी पेढीतील कर्मचारी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरकाम करणाऱ्या महिलेकडून दागिने लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौकात सराफी पेढी आहे. १३ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास चोरटा सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरला. चोरट्याने सराफी पेढीतील कर्मचारी महिलेला अंगठी दाखविण्यास सांगितले. महिलेला बोलण्यात गुंतवले. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने ४० हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरुन नेली. अंगठी चोरुन चोरटा पसार झाला. चोरट्याने अंगठी चोरल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांकडून सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार कुचेकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×