युनीट सहाची कामगिरी
marathinews24.com
पुणे – हातावर गोंदलेल्या महिलेच्या नावावरून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अपहरण व खुनाचा प्रयत्नातील ९ वर्षापासुन फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमर बबन घाडगे (वय २९, रा. दिपकनगर, गोपाळपट्टी मांजरी बुद्रूक, हडपसर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ३० मे रोजी युनीट सहाचे पथक कोम्बिंग ऑपरेशन करीत असताना आरोपीची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.
पुण्यात दिवसाढवळ्या सोनसाखळी हिसकावल्या – सविस्तर बातमी
कोम्बिंग ऑपरेशनवेळी पोलीस अंमलदार समीर पांडुळे व गणेश माने यांना २०१७ मधील अपहरण आणि खुनाच्या गुन्हयामधील पाहिजे असलेला आरोपी अमर बबन घाडगे याची माहिती मिळाली. त्याने हातावर महिलेचे नाव गोंदले असून, तो हडपसरमधील लक्ष्मी कॉलनी परिसरात असल्याचे समजेल. त्यानुसार अमर घाडगे याला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, एसीपी राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, सतिश वणवे, समीर पांडुळे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमित कांबळे, शेखर काटे, उमेश शेलार, अनिल जामगे यांनी केली.






















