Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

वारजे माळवाडीत, मुंढव्यात दारूविक्रीवर कारवाई

वारजे माळवाडीत, मुंढव्यात दारूविक्रीवर कारवाई

९ जणांवर गुन्‍हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मुढवा आणि वारजे माळवाडी परिसरात अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी छापेमारी करत गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही ठिकाणी परवानगीशिवाय दारू साठा ठेवून विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले. दोन्‍ही गुन्‍ह्यात ९ जणांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्‍या हद्दीत अवैधपणे दारू विक्री केल्‍याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहा – सविस्तर बातमी 

प्रिती विजय नव्‍हले, सागर बिरे, शशि कचरावत, सुधिर कचरावत, संगिता परदेशी, जुबेर शेख, वैशाली उर्फ याडी चव्‍हाण, लताबाई रास्‍ते यांच्‍या महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मुंढवा येथे अवैध दारू प्रकरणी निकिता गारूंगे हिच्‍यावर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान आरोपींकडून गावठी हाथभट्‍टीची दारू जप्‍त केली असून त्याची किंमत हजारो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ जून रोजी शहरात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान मुढवा आणि वारजे माळवाडी परिसरात अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापे टाकण्यात आले. तपासणीदरम्यान परवानगीशिवाय मद्यसाठा ठेवून त्याची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ मद्यसाठा जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदविले. विषारी दारू प्रकरणानंतर शहर व उपनगरांमध्ये अवैध मद्यविक्रीविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×