Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

समाज कल्याण विभागाच्या विविध योजना वंचितांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी

समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांचे निर्देश

marathinews24.com

पुणे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा व सामाजिक प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी बैठकीत विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

शीतल तेली- उगले यांनी स्वीकारला पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार – सविस्तर बातमी

बैठकीत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करण्याबाबत विशेष चर्चा करण्यात आली. ग्रामीण व शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक संवाद, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

तसेच राज्य शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भातही सविस्तर आढावा घेण्यात आला. समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती वाढविणे, तक्रारींवर तातडीने कारवाई करणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय वाढविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

पुणे जिल्ह्यातील गावांची व वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याच्या प्रक्रियेचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील प्रस्ताव, स्थानिक स्तरावरील कार्यवाही आणि प्रशासनिक प्रक्रिया गतीमान करण्याबाबत निर्देश देण्यात आले. सामाजिक समतेच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा असून संबंधित विभागांनी यावर प्राधान्याने काम करावे, असे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या समस्या, त्यांचे पुनर्वसन, पर्यायी रोजगार, सुरक्षा साधनांची उपलब्धता आणि शासकीय योजनांचा लाभ याबाबतही चर्चा झाली. संबंधित विभागांनी अशा कामगारांची अद्ययावत माहिती संकलित करून त्यांच्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. स्थलांतर, आरोग्य सुविधा, मुलांचे शिक्षण, निवास आणि शासकीय योजनांचा लाभ यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

तृतीय पंथीयांच्या सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक समस्यांचाही बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, ओळखपत्र, आरोग्य सुविधा आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

बैठकीत घेण्यात आलेल्या सर्व विषयांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिले.

यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. काही अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहिले तर काही अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

यावेळी या बैठकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला. प्रलंबित गुन्ह्याच्या अनुषंगाने विहित काल मर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×