अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत
marathinews24.com
पुणे – राजगुरुनगर ता. खेड, जि. पुणे येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या बी.सी.ई.बी.सी. मुलींच्या शासकीय वसतिगृहात इयत्ता ८ वी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय, अनु. जाती, अनु. जमाती, वि.जा.भ., आ.मा. प्रवर्ग, वि.मा. प्रवर्ग, अपंग व अनाथ मुलींना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीनुसार रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते देवीची आरती – सविस्तर बातमी
प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना शासनामार्फत निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरूण-पांघरूण तसेच दरमहा खर्चासाठी प्रत्येकी रु. ५०० निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधनासाठी प्रत्येकी रु. १०० देण्यात येतात.
सन २०२५-२६ या वर्षासाठी सर्व अभ्यासक्रमांचे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ११ जून २०२५ पासून सुरू झाली असून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ आहे. विद्यार्थिनींनी ऑनलाइन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर भरावा. अधिक माहितीसाठी बी.सी.ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह, राजगुरुनगर (ता. खेड, पुणे) येथील गृहपाल श्रीमती पी. व्ही. आंबले यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.























