Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

वीजेच्या धक्क्याने कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू

वीजेच्या धक्क्याने कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू

‘मेस’मधील जलशुध्दीकरण यंत्रात वीज प्रवाह उतरल्याने दुर्घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील कृषी महाविद्यालयातील ‘मेस’मध्ये असलल्या जलशुद्धीकरण यंत्रातून विजेच्या धक्का बसल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर दोषींवर कारवाई, तसेच सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

गृहप्रकल्पात काम करताना तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय २३, रा. डोंगरगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे मृ्त्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. चैतन्य कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात तो होता. तो ‘ई मेस’ समितीचा सदस्य होता. मेसचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी ही समिती काम करते. १४ मार्च रोजी तो कृषी महाविद्यालयातील मेसचे कामकाज तो पाहत होता. त्या वेळी मेसमधील जलशुद्धीकरण यंत्राचे (फिल्टर) काम व्यवस्थित चालते का नाही, याची पाहणी तो करत होता. त्या वेळी अचानक जलशुद्धीकरण यंत्रात वीज प्रवाह उतरला. विजेच्या धक्क्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×