Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

गृहप्रकल्पात काम करताना तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – नियोजित गृहप्रकल्पात काम करताना तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजूर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव भागात घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जोतीराम राजाराम शेवाळे (मूळ रा. उमदी, ता. जत, जि. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत शेवाळे याचे चुलतभाऊ याबाबत रामचंद्र सदाशिव शेवाळे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खंडणीसाठी व्यापार्‍याचे अपहरण करणाऱ्या सराइतांना बेड्या – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोतीराम हा आंबेगाव परिसरातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या ठिकाणी काम करत होता. सोमवारी (२३ मार्च) तळमजल्यावरील चरात (डक्ट) तो मृतावस्थेत सापडला. इमारतीच्या गच्चावरील काही भाग अर्धवट उघडा होता. तेथे काम करत असताना जोतीराम हा तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ठेकेदाराने सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे जोतीराम याचे चुलतभाऊ रामचंद्र यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×