Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

खंडणीसाठी व्यापार्‍याचे अपहरण करणाऱ्या सराइतांना बेड्या

खंडणीसाठी व्यापार्‍याचे अपहरण करणाऱ्या सराइतांना बेड्या

पुणे गुन्हे शाखेची कामगिरी

marathinews24.com

पुणे – कोट्यावधी रूपयांच्या खंडणीसाठी व्यापार्‍याचे अपहरण करणार्‍या पाच जणांना सराईत टोळीला गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी २४ तासात अटक केली आहे. ही घटना २४ मार्चला गुलटेकडी परिसरात घडली होती. प्रणव बबन निवंगुणे (वय २३ आंबेगाव पठार) साहिल श्रीकांत खुटवड (वय २१ रा, भिलारेवाडी कात्रज) सौरव विश्वनाथ पवार (वय २७ रा. बावधन खुर्द) शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६ रा. आंबेगाव पठार, कात्रज ) मंदार श्रीधर दारवटकर (वय ३० रा, वडगाव बुद्रुक सिंहगडरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणारा गजाआड – सविस्तर बातमी 

गुलटेकडी परिसरात राहणार्‍या व्यापार्‍याचे टोळीने २४ मार्चला टिंबर मार्वेâट परिसरातून अपहरण केले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नीला फोन करून आरोपींनी दीड कोटींची मागणी केली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम स्वारगेटमधील मित्रमंडळ चौकात आणून देण्याचे सांगितले होते. याप्रकरणी आरोपींच्या शोधार्थ गुन्हे शाखेच्या दोन टिम तयार करून मित्रमंडळ चौकात तैनात केली. त्याठिकाणी आरोपी प्रणाव निवंगुणे अणि साहिल खुटवड हे रक्कम घेण्यासाठी आले होते. पथकाने दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता, आरोपींनी व्यापार्‍याला मोटारीतून खेड शिवापूरच्या दिशेने नेल्याची माहिती दिली.

गुन्हे शाखेच्या पथकाने समन्वयाने खेड शिवापुरकडे धाव घेतली. मोटार चालकाला अडवून अपहृत व्यापार्‍याची सुखरुप सुटका केली. इतर तीन आरोपीतांना ताब्यात घेवुन स्वारगेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. संबंधित आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर पुणे शहर, ग्रामीण हद्दीत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, एसीपी राजेंद्र मुळीक, एसीपी शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, एपीआय अमोल रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×