Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

ऊसावरील तांबेरा रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

रोग आढळून आल्यास शेतकऱ्यांनी नियंत्रणात्मक उपाययोजना राबविण्याचे आवाहन

marathinews24.com

बारामती – ऊस पीकावर तांबेरा रोगावर आढळून आल्यास शेतकऱ्यांनी नियंत्रणात्मक उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन बारामती तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.

‘पद्मश्री उदयाना यांना राष्ट्रपिता गांधी पुरस्कार प्रदान – सविस्तर बातमी

तांबेरा रोगाची लक्षणे : पानांवर पिवळे व तांबडे ठिपके दिसून ते हळूहळू वाढतात.पानांच्या दोन्ही बाजूंवर नारिंगी रंगाची पावडर आढळते. पाने पिवळी पडून सुकतात.

पारंपारिक उपाय : रोगग्रस्त उसाच्या कांड्या तात्काळ कापून नष्ट कराव्यात. रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी, लागवडीसाठी निरोगी कांड्यांचा वापर करावा. शेतात पाण्याचा योग्य निचरा ठेवावा. शेतात पाणी साचू देऊ नका रोगग्रस्त बेण्यांचा वापर टाळावा.

रासायनिक उपाय : अझोक्सिस्ट्रॉबिन + डिफिनेकोनाझोल १६० मिली प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कार्बेन्डाझिम ०.१ टक्के द्रावण फवारणीसाठी वापरावे.

बेणे प्रक्रिया : उसाच्या कांड्या ५०°C तापमानाच्या गरम पाण्यात २ तास भिजवून ठेवाव्यात. संक्रमित उसातील बुरशी नष्ट करण्यासाठी स्टीम थेरपीचा वापर करावा. उपाययोजना तातडीने राबवून तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव थांबवावा आणि ऊस पिकाचे संरक्षण करावे, असे आवाहन हाके यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×