कोथरूडमधील गांधी भवन हॉलमध्ये २१ सप्टेंबरला पुरस्कार सोहळा पडला पार
marathinews24.com
पुणे – इंडोनेशियातील बाली येथील गांधी पुरी आश्रमचे ‘पद्मश्री अगुस इंद्रा उदयाना’ यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोथरूडमधील गांधी भवन हॉलमध्ये २१ सप्टेंबरला पुरस्कार सोहळा पार पडला. राष्ट्रपिता महात्मा गांधी समिती आणि ट्रॅव्हएक्स्पर्ट डेस्टिनेशन्स यांच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येते. हिंदुस्थानाबाहेर राष्ट्रपित महात्मा गांधींचे विचार व कार्य प्रसारित करण्यासाठी अगुस इंद्रा उदयाना’यांनी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली.
पुणेकरांचा सुर्या बरोबर मैत्रीपूर्ण करार…!! – सविस्तर बातमी
एअर मार्शल अविनाश क्षीरसागर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला. पदमश्री अगूस इंद्र उदयाना म्हणाले,’महात्मा गांधी यांचे चरित्र सर्वांनी वाचले पाहिज. सोशल मीडियाचा प्रभाव वाढताना दिसतो. परंतु तो हाताळताना आपले मन चक्षु उघडून खर्या अर्थाने समाजाकडे पाहणे महत्वाचे आहे. महात्मा गांधी यांच्या काळात सोशल मीडिया नव्हता पण त्यांच्या विचारांनी जगाला मोहित केले, त्यापैकीच मी एक आहे. ग्राम स्वराज्य नेमके काय याची ओळख करून देणे महत्वाचे आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे किसन भोसले होते. सोहळ्याचे आयोजन राहुल भरत शेलार आणि माधवी राहुल शेलार यांनी केले.
अॅड अभय छाजेड म्हणाले, ‘गांधीजी जेव्हा आप्रिâकेतून भारतात आले आणि त्यांनी स्वातंत्र्य लढा सुरु केला तेव्हा जगभरात महायुद्धाचे सावट होते, महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा दिला त्यावेळी हे खरे महत्वाचे होते. आजचे पुरस्कारारार्थी पदमश्री अगूस इंद्र उदयना हे खर्या अर्थाने गांधीजींचे अनुयायी आहेत हे त्यांच्या इंडोनेशियामधील गांधीपुरी आश्रमाच्या स्थापनेवरून दिसून येते. गांधीजींचे विचार परदेशात प्रचार प्रसार करणारे शरयू अगूस हे या पुरस्काराचे मानकरी आहेत. तर एअर मार्शल श्री अविनाश क्षीरसागर म्हणाले, ‘स्वदेशीचे महत्व महात्मा गांधी यांनी जाणले, गांधीजींच्या स्वावलंबन तत्वाचा परिपाठ आम्ही सैन्यात असताना देखील अवलंबतो, भारतीय सैन्य नेहमी आधी चर्चा आणि मग कृती यालाच प्राधान्य देते. हि प्रेरणा महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांनीच आम्हाला दिली आहे.’
चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक धनंजय भावलेकर म्हणाले, ‘गांधीजींनी अहिंसेचा त्या काळात प्रचार प्रसार केला, परंतु आता याही काळात अहिंसेच्या विचारांची गरज आहे. आज जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये संघर्ष सुरु आहे, तरुणाई डिजिटल युगात जोमाने प्रवेश करते आहे, एकीकडे मनाचे युद्ध आणि डिजिटल युद्ध देखील सुरु आहे, या सगळ्या गुंतागुंतीमध्ये महात्माचे विचार समतोल साधण्यास विचार करतील असे सांगितले. यावेळी अॅड. अभय छाजेड, सचिव अन्वर राजन, माजी नगरसेवक प्रदीप (बाबा) धुमाळ, जमिर मुल्ला, दिग्दर्शक सागर वंजारी, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, इंदुमती जोंधळे, मनोविकास प्रकाशन चे अरविंद पाटकर उपस्थित होते.





















