सहकारनगर, पर्वती, कर्वेनगर परिसरात दागिने हिसकावले
marathinews24.com
पुणे – शहरातील सहकारनगर, पर्वती तसेच कर्वेनगर परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सहकारनगर भागातील तुळशीबागवाले काॅलनी परिसरात एका ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र, कंठीमाळ असा अडीच लाख रुपयांचा ऐवज हिसकावून नेण्यात आल्याची घटना मंगळवारी (१ सप्टेंबर) सायंकाळी घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीएमपीएल बसची धडक बसली, कमवता पुरूष गंभीर जखमी, मदतीचे आवाहन – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७८ वर्षीय ज्येष्ठ महिला पर्वती परिसरात राहायला आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्या तुळशीबागवाले काॅलनीतून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन लाख रुपयांची सोन्याची कंठीमाळ हिसकावून नेली. या घटनेनंतर काही वेळात चोरट्यांनी पर्वती भागातील मित्रमंडळ काॅलनीत एका महिलेचे ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक अक्षय गायकवाड तपास करत आहेत.
कर्वेनगर भागात एका ज्येष्ठ महिलेचे ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ७० वर्षीय महिला कर्वेनगरमधील शिवगंगा काॅलनीत राहायला आहेत. त्या मंगळवारी (१ सप्टेंंबर) रात्री साडेआठच्या सुमारास शिवगंगा काॅलनीतून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.





















