Breking News
महापालिका वसाहतीतील घरातून दागिने चोरीपीएमपीचा बनावट पास तयार करुन फसवणूकहिंजवडी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी हाय पॉवर कमिटीची पहिली बैठक संपन्नचाकण परिसरातील अतिक्रमण कार्यवाहीला सुरुवात; पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी करणार पाहणीउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावाबोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेधदहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादा

महापालिका वसाहतीतील घरातून दागिने चोरी

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीला

 

चोरट्यांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घोरपडे पेठेतील महापालिका वसाहतीतील एका घरातून चोरट्यांनी दोन लाख २४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे.

पीएमपीचा बनावट पास तयार करुन फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे २८ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेनिमित्त सातारा येथे गेले होते. त्या सायंकाळी कामावरुन आल्या. त्यानंतर त्यांनी एका पिशवीत दागिने काढून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या. तेथून त्या घरी आल्या. स्वयंपाकघरातील कामे त्यांनी आटोपली. मुलगा घरात झोपाला होता. सकाळी दहाच्या सुमारास त्या कामावर जाण्यासाठी निघाल्या. पिशवीतील दागिन्यांची त्यांनी पाहणी केली. तेव्हा दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून महिलेच्या घरात प्रवेश करुन चोरट्याने दागिने लांबविले. चोरटा माहितगार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

 

पादचारी तरुणाचा मोबाइल हिसकावला

पादचारी तरुणाचा मोबाइल हिसकावून नेण्यात आल्याची घटना कोंढव्यात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण बिबवेवाडीतील आईमाता मंदिर परिसरात राहायला आहे. तो शुक्रवारी (४ ऑगस्ट) मध्यरात्री बाराच्या सुमारास कोंढव्यातील कमेला वसाहत परिसरातून निघाला होता. त्या वेळी तरुण मोबाइलवर बोलत निघाला होता. दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाच्या हातातील दहा हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. तरुणाने आरडाओरडा केला. दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक रमेश शेलार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×