Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

ऐतिहासिक लाल महाल चौकात रुणाईचा जनसागर उसळल – ढोल-ताशा, हलगीसह पारंपरिक वाद्यांचा गजर

marathinews24.com

पुणे – ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल-ताशांचा मंगलमय गजर, हलगीच्या पारंपरिक वादनावर थिरकणारी तरुणाई, उसळलेला जनसागर आणि काळजाचा ठोका चुकविणारे मानवी मनोरे अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुनीत बालन ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डीजेमुक्त संयुक्त दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला. ऐतिहासिक लाल महाल चौकात तुडुंब गर्दीसमोर शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत संयुक्त दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. सलग दुसऱ्या वर्षी डीजेमुक्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून पुनीत बालन ग्रुपने यानिमित्ताने एक नवा आदर्श निर्माण केला.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळी – सविस्तर बातमी

पुण्यातील ३१ सार्वजनिक गणेश मंडळांनी या संयुक्त दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला. पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी गतवर्षी महाराष्ट्रातील पहिल्या डीजेमुक्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत झाले. यंदा पुण्यात डीजेच्या वापरावरून वातावरण तापले असतानाही पुनीत बालन यांनी डीजेमुक्त दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्याची ठाम भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेला ३१ गणेश मंडळांनी साथ देत संयुक्त दहीहंडीत सहभाग नोंदविला.

प्रभात बँडच्या सुमधुर वादनाने दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर श्रीमंत पेशवे गणेश मंदिर तसेच लाल महाल येथे माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. मानवंदना, रमणबाग, गजर प्रतिष्ठान, शिवाज्ञा ढोल, शिवयोद्धा मर्दानी आखाडा, आवर्तन, समर्थ आणि शिवमुद्रा पथकांच्या जोरदार वादनाने संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला. उपस्थित तरुणाईने ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला.

शिवाज्ञा पथकाने जत्रा यात्रेतील बगाड आणि श्रीनाथ बाबांची पालखी याचे सादरीकरण करत भंडाऱ्याची उधळण केली. वारकऱ्यांच्या पखवाज वादनाने वातावरण भक्तिमय झाले, तर हलगीच्या दमदार वादनाने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील ऐतिहासिक लाल महाल चौकात आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेली दहीहंडी, विद्युत रोषणाई आणि त्यावर करण्यात आलेली कोल्ड फायरची आतषबाजी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या दहीहंडीला २१ हून अधिक गोविंदा पथकांनी पाच ते सात थर रचत सलामी दिली.

दहीहंडीच्या सलामीसाठी सुरुवातीला महिलांच्या शिवकन्या गोविंदा पथकाने सहभाग घेतला. त्यानंतर कसबा पुणे, म्हसोबा दहीहंडी संघ, पंढरीनाथ सेवा मंडळ, पुणेश्वर कसबा पेठ, गणेश मित्र मंडळ कसबा पेठ, राष्ट्र प्रथम कसबा पेठ, भोईराज संघ, मुंबईचे आम्ही आमचे राजे आणि शिवतेज संघ यांसह अनेक गोविंदा पथकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

रात्री पावणेदहा वाजता शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत ऐतिहासिक दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. या संघाने १ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस आणि मानाची ट्रॉफी पटकावली.

या दहीहंडी उत्सवाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. तसेच परदेशी पर्यटकांनीही उत्सवात सहभाग घेतला

“पुणेकरांनी सलग दुसऱ्या वर्षी डीजेमुक्त दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा उत्सव यशस्वी केल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही तितक्याच उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करता येतो, हे पुणेकरांनी अनुभवले आणि पाहिले. यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत झाली, तसेच पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्या कलाकारांनाही रोजगार मिळाला. आगामी गणेशोत्सवही अशाच पद्धतीने साजरा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”»

– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप तथा विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×