Breking News
दातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हेआदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान

१४ वर्षांनंतर शिक्षक पुरस्काराची परंपरा पुन्हा सुरू; ४२ शिक्षकांचा सन्मान

विद्यार्थ्यांना अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण देण्याची गरज – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 

marathinews24.com

पुणे – विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण देण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा, जीवनमूल्ये तसेच विधायक प्रथा-परंपरांमागील विज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजण्यास मदत होईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

हिंजवडी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी हाय पॉवर कमिटीची पहिली बैठक संपन्न – सविस्तर बातमी

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्यातील ४२ शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ, पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक यांचे शिक्षण, संशोधन, शिक्षक प्रशिक्षण, ग्रामविकास आणि आरोग्य क्षेत्रातील मूलभूत योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शिक्षक पुरस्कार सुरू करावेत, अशी मागणी आंतरभारती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व डॉ. जे. पी. नाईक यांच्या कार्याचे अभ्यासक डॉ. सागर देशपांडे यांनी केली होती. ही मागणी मान्य करून त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करताना आनंद होत असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करताना कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या शिफारशीचा विचार करण्यात आलेला नाही. पुरस्कार केवळ गुणवत्तेच्या आधारे देण्यात आले असून, कोणत्याही राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या चिठ्ठीवर हे पुरस्कार दिले गेलेले नाहीत, असे मंत्री श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

मोठ्या व्यक्तिमत्त्वांची माहिती आजच्या पिढीला नसणे ही चिंतेची बाब आहे. विद्यार्थ्यांमध्ये कर्तृत्वासोबत नम्रताही विकसित झाली पाहिजे. बदलत्या काळात विद्यार्थ्यांच्या मनात भविष्यासंदर्भात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे शिक्षकांनी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षकांची भूमिका केवळ वर्गातील अध्यापनापुरती मर्यादित नसून ते सामाजिक नेतृत्वाची भूमिकाही बजावत असतात. आज विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाचे मोठे भांडार उपलब्ध असले तरी शिक्षकांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट बदलत्या काळानुसार शिक्षकांवर अधिक व्यापक जबाबदाऱ्या आल्या आहेत, असे मंत्री श्री. पाटील यांनी नमूद केले.

महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती आणि जीवनमूल्यांचा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सवासारख्या उत्सवांचे सांस्कृतिक व धार्मिक पैलू नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. उत्सव केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता त्यामागील सामाजिक आणि सांस्कृतिक आशय विद्यार्थ्यांना समजला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

एकल पालक कुटुंबांसाठी उपक्रम

सामाजिक काम हे गरजेनुसार झाले पाहिजे, असे सांगताना मंत्री श्री. पाटील यांनी एकल पालक कुटुंबांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एकल पालक योजनेसाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. कोथरूड परिसरातील सुमारे ९५० एकल महिलांना ग्राहक पेठेच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीत धान्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी एकल माता कुटुंबांना आवश्यक मदत मिळणे गरजेचे आहे. अशा कुटुंबांना व्यापक स्तरावर मदत उपलब्ध झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम उच्च शिक्षणातील मुलींच्या सहभागावर होईल, असेही त्यांनी नमूद केले.

पुढील वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सन्मान
शिक्षण व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सन २०१२ मध्ये खंडित झालेली शिक्षक पुरस्काराची परंपरा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून १४ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गुणात्मक शिक्षण, शैक्षणिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील ४२ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करताना विविध स्तरांवर छाननी करण्यात आली. राज्यस्तरीय समितीमध्ये मान्यवर शिक्षकांचा समावेश होता. कठोर आणि पारदर्शक निवड प्रक्रियेतून ४२ शिक्षकांची अंतिम निवड करण्यात आल्याचे डॉ. देवळाणकर यांनी सांगितले.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी पुरस्कारामुळे केवळ शिक्षकांचाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांचाही सन्मान होत असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. किशोर इंगळे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, सचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह राज्यातील विविध महाविद्यालयांतील पुरस्कारप्राप्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यापीठाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त डॉ. देविदास वायदंडे आणि अंजली जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्जनशीलता, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन मिळेल, तसेच शिक्षकांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×