Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

वसंतराव नाईक

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे, या योजनांचा लाभ घेण्याकरिता इच्छुकांनी www.vint.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अंबाजोगाईच्या चिमुकल्या आरुषने चार जणांना दिले जीवनदान – सविस्तर बातमी 

पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार, राजे उमाजी नाईक, परमपुज्य गंगानाथ महाराज, ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी, श्रीकृष्ण आणि विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) अंतर्गत बीज भांडवल कर्ज योजना, एक लाख रूपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना राबवून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहणार आहे. तथापि कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास कमाल १२ टक्क्यापर्यंतचे व्याज लाभार्थीचा बँक खात्यावर महामंडळाच्यावतीने जमा करण्यात येणार आहे. एक लाख थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार आहे. लाभार्थीने २ हजार ८५ रुपायांचा नियमितपणे ४८ समान मासिक हप्त्यामध्ये परतफेड केल्यास लाभार्थ्यांना व्याज अदा करावे लागणार नाही, परंतु थकित हप्त्यांवर द.सा.द.शे. ४ टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी-विग, सर्वे क्र. १०५/१०६, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, आळंदी रोड, येरवडा, पुणे. तसेच कार्यालयाच्या ०२०-२९७०३०४९ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×