Breking News
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीलाबारामतीत पुन्हा विमान अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही

अंबाजोगाईच्या चिमुकल्या आरुषने चार जणांना दिले जीवनदान

अंबाजोगाईच्या चिमुकल्या आरुषने चार जणांना दिले जीवनदान

पालकांच्या दातृत्वाने वैद्यकीय क्षेत्र हेलावले

marathinews24.com

पुणे – अंबाजोगाई येथील मूळ रहिवासी असलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या आरुष शिंदे या चिमुरड्याचा दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडल्यामुळे अपघाती मृत्यू झाला, मात्र त्याच्या पालकांनी घेतलेल्याअत्यंत धाडसी आणि निःस्वार्थ निर्णयामुळे चार रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे. या अथांग दुःखाच्या प्रसंगातही त्याच्या पालकांनी घेतलेल्या मरणोत्तर अवयवदानाच्या अत्यंत धाडसी आणि निःस्वार्थ निर्णयामुळे तब्बल चार बालकांना नवीन जीवन आणि दृष्टी मिळाली आहे.

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे – सविस्तर बातमी 

बाल अवयवदानासाठी आवश्यक असलेले कठोर वैद्यकीय निकष आणि अशा कठीण प्रसंगी शोकाकुल कुटुंबाला सामोरे जावे लागणारे भावनिक आव्हान यामुळे बाल अवयवदानाची ही घटना अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे. आरुष हा पुणे विभागातील आतापर्यंतचा सर्वात लहान वयाचा अवयव दाता ठरला असून या ऐतिहासिक दातृत्वाने संपूर्ण आरोग्य क्षेत्र हेलावून गेले आहे.

मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले विशाल गौतम शिंदे हे गेल्या बारा वर्षांपासून नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या पोटी आरुषचा जन्म झाला होता. एकुलता एक मुलगा असलेल्या आरुषचा ताडीवाला रोड येथील निवासस्थानी २ जून रोजी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर अपघात झाला. त्याला तात्काळ रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक सल्लागार डॉ. संजय वोरा आणि बालरोग आयसीयूच्या वैद्यकीय पथकाने या निष्पाप जिवाला वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस केला. परंतु, नियतीला काही वेगळेच मान्य होते. अखेर १२ जून रोजी डॉ. देविदास भालेराव यांनी आरुषला ‘ब्रेन डेड’ घोषित केले. आपल्या काळजाच्या तुकड्याला गमावल्याच्या अकल्पनीय दुःखात बुडालेल्या शिंदे कुटुंबाचे प्रत्यारोपण समन्वयक लोचना जाधव यांनी अत्यंत संवेदनशीलतेने समुपदेशन केले.

आपल्या लाडक्या आरुषच्या रूपाने कोणाचे तरी घर प्रकाशमान व्हावे, या भावनेतून त्याच्या पालकांनी अत्यंत कठीण प्रसंगात अवयव दानाचा धाडसी निर्णय घेतला.

झेडटीसीसी पुणेच्या माध्यमातून आरुषचे मूत्रपिंड आणि यकृत रुबी हॉल क्लिनिक तसेच मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथील दोन गरजू बाल रुग्णांना यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आले. याशिवाय त्याचे दोन्ही कॉर्निया देखील दान करण्यात आले असून त्यामुळे अंध असलेल्या दोन मुलांना नवीन दृष्टी लाभली आहे. सर्व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून या अभूतपूर्व कामगिरीबद्दल रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ. विवेक लाल आणि सीईओ डॉ. मुदित सक्सेना यांनी संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहेत.

आरुषचे आजोबा आणि अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत शिंदे यांनी अत्यंत भावूक होत सांगितले की, त्यांच्या नातवाने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी चार मुलांना जीवनदान दिले असून आरुष आजही त्यांच्यासाठी जिवंतच आहे. स्वतःचा पोटचा गोळा गमावूनही समाजात अवयव दानाचा एक महान संदेश देणाऱ्या आरुषच्या आई-वडिलांच्या या धैर्याला संपूर्ण महाराष्ट्र सलाम करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×