Breking News
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

पुण्यातील नवले पूल परिसरात पुन्हा अपघात

पुण्यातील नवले पूल परिसरात पुन्हा अपघात

सिमेंट मिक्सर उलटून दुचाकीस्वाराचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – भरधाव सिमेंट मिक्सर उलटून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात मध्यरात्री घडली. या प्रकरणी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामेश्वर मच्छिंद भोगले (वय ३१, सध्या रा.वाघजाईनगर, कात्रज, मूळ रा. सांगवी, हाजीपूर, जि. बीड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात सिमेंट मिक्सर चालक गोरख लक्ष्मण रनसुरे (वय ५०, रा. काळभोर बिल्डींग, लाेणी रेल्वे स्थानकाजवळ, लोणी काळभोर) हा किरकाेळ जखमी झाल्याची माहिती नऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी दिली.

एसटी प्रवासी महिलेचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरातून सिमेंट मिक्सर बुधवारी (१० जून) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईकडे निघाला होता. तेथील वळणावर मिक्सर चालकाचे नियंत्रण सुटले आणि १६ चाकी मिक्सर उलटला. त्या वेळी तेथून निघालेले दुचाकीस्वार रामेश्वर भोगले हे मिक्सरच्या चाकाखाली सापडले. अपघातात दुचाकीस्वार भोगले गंभीर जखमी झाले. सिमेंट मिक्सर उलटल्यानंतर चालक रनसुरे याच्या डोक्याला दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार भोगले, मिक्सर चालक रनसुरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच भोगले यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. अपघातानंतर काही काळ बाह्यवळण मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर क्रेनच्या सहायाने बाजूला काढून वाहतूक पूर्ववत केली.

बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल भागात भरधाव अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन गंभीर अपघात घडले आहेत. नवले पूल परिसरात झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नवले पूल परिसरात झालेल्या अपघातांत अनेक बळी गेले आहेत. नवले पुलावर गेल्या वर्षी १३ नाेव्हेंबर रोजी साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे- भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंढव्यातील केशवननगर परिसरात नुकतीच घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.सूरज रामेश्वर कोकाटे (वय २८) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रामेश्वर (वय ५८, रा. जिंतूर, जि. परभणी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा एका खासगी कंपनीत कामाला होता. ३ जून रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीस्वार सूरज हा केशवनगरमधील फ्लोरिडा इस्टेट सोसायटी परिसरातून निघाला होता. त्या वेळी भरधाव डंपरने दुचाकीस्वार सूरजला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सूरज याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×