Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

APK Fraud Pune : लग्नपत्रिकेच्या एपीके फाईलमधून ज्येष्ठाच्या खात्यावर डल्ला

APK Fraud Pune : लग्नपत्रिकेच्या एपीके फाईलमधून ज्येष्ठाच्या खात्यावर डल्ला

बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – APK Fraud Pune : ‘वेडिंग इनव्हिटेशन’ नावाची एपीके फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर ज्येष्ठाच्या बँक खात्यातून दोन लाख ७४ हजार ९६० रुपये परस्पर ट्रान्सफर करण्यात आले. लग्नपत्रिकेच्या नावाने पाठविलेल्या फाईलचा वापर करून मोबाईलचा अॅक्सेस घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नारायण कृष्णा ब्रह्मणकर (रा. घर क्रमांक तीन, स्वरारोह बिल्डिंग, चिदानंद सोसायटी, पाषाण-सुस रोड, पाषाण, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

आजार बरा करण्याचे आश्वासन; एक लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ सप्टेंबर ते दि. २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन फसवणूक झाली. आरोपीने ब्रह्मणकर यांना एपीके फाईल पाठविली. ती डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलचा अॅक्सेस मिळवून त्यांच्या संमतीशिवाय पैसे विविध बँक खात्यांत ट्रान्सफर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. APK Fraud Pune  दि. २ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक खिल्लारे तपास करीत आहेत.

तब्बल ऑनलाइन ४ लाखांचा गंडा

वर्क फ्रॉम होम जॉबच्या नावाखाली सुरुवातीला किरकोळ परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर चार लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नवीन कुमार कुष्णप्पा (रा. अमोरा पोलीस विंग, डीएन परांडे पार्क, पोरवाल रोड, धानोरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ जुलै ते दि. १९ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाईन व्यवहार झाले. आरोपीने टेलिग्रामवर लिंक पाठवून अकाऊंट तयार करण्यास सांगितले. सुरुवातीला थोडा परतावा दिला. त्यानंतर विश्वासाचा फायदा घेत वेगवेगळ्या बँक खात्यांत वेळोवेळी चार लाख ७३ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. ही रक्कम किंवा मिळणारा परतावा दिला नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक राऊत तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×