पतीचा पार्किन्सन्स आजार पूर्णपणे बरा करण्याचे आमिष
marathinews24.com
पुणे – Medical Fraud : पतीचा पार्किन्सन्स आजार पूर्णपणे बरा करण्याचे आश्वासन देऊन ज्येष्ठ महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींपैकी एकाने स्वतःला युनानी डॉक्टर असल्याचे भासविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्ती आणि त्याच्या साथीदारांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेनी फिर्याद दिली आहे,
लोहियानगरच्या पान शॉपमध्ये प्रतिबंधित गुटखा; दोघांवर गुन्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ फेब्रुवारी ते दि. २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत फ्लॅट क्रमांक ११बी, लेन क्रमांक ई, नॉर्थ मेन रोडवरील एमआयटी ऑलम्पस येथे हा प्रकार घडला. Medical Fraud आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या पतीवर युनानी डॉक्टरकडून उपचार करण्याचे आणि आजार पूर्णपणे बरा करण्याचे आश्वासन दिले. त्यातील एकाने डॉक्टर असल्याचे भासवून एक लाख रुपये घेतल्याची तक्रार आहे. पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
रिवॉर्ड पॉइंटच्या बहाण्याने क्रेडिट कार्डमधून पैसे काढले
रिवॉर्ड पॉइंटची ऑफर सांगून वेबसाइटवर ओटीपी टाकण्यास प्रवृत्त करत तरुणाची ३५ हजार ४०२ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक हरिभाऊ ओंबळे (रा. साई सत्यम पार्क, समर्थ कृपा सोसायटी, नगर-पुणे हायवे, वाघोली, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ मे २०२६ रोजी हा ऑनलाईन प्रकार घडला. आरोपीने ऑफरचे आमिष दाखवून वेबसाइट उघडण्यास सांगितले. त्यावर प्राप्त ओटीपी टाकल्यानंतर ओंबळे यांच्या क्रेडिट कार्डमधून पैसे ट्रान्सफर झाले. दि. २ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला. वाघोलीतील गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक तपास करीत आहेत.























