खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Lohianagar Gutkha Seizure : शहरातील लोहियानगरमधील पान शॉपमध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानदाराने दुसऱ्या व्यक्तीकडून हा माल विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याची नोंद आहे. बिलाल अजमुद्दीन शेख (वय २८, रा. ५४ एचपी, घर क्रमांक ५६, लोहियानगर, पुणे) आणि अक्रम शेख (रा. कोंढवा, पुणे) यांच्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयूर सूर्यकांत शिंदे (वय ३८, नेमणूक खंडणी विरोधी पथक एक, गुन्हे शाखा, पुणे शहर) यांनी फिर्याद दिली आहे.
बस प्रवासात ज्येष्ठ महिलेची ७० हजारांची बांगडी चोरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी दीड वाजता लोहियानगरमधील बिलाल पान शॉपमध्ये हा प्रकार आढळला. बिलाल शेख याने विनापरवाना प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ स्वतःच्या ताब्यात विक्रीसाठी बाळगल्याचा आरोप आहे. संबंधित माल त्याने अक्रम शेख याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. Lohianagar Gutkha Seizure अक्रमचे पूर्ण नाव आणि पत्ता उपलब्ध नाही. तक्रारीच्या आधारे अन्नसुरक्षेशी संबंधित तरतुदींनुसारही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा नोंदविताना आरोपींना अटक झालेली नव्हती. पोलिस उपनिरीक्षक दाढे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.























