Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

सुशिक्षित बेरोजगारांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी

marathinews24.com

पुणे – सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, कारागीर तसेच बचतगटांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. एस. के. केंजळे यांनी केले आहे.

ऊसावरील तांबेरा रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन – सविस्तर बातमी

या योजनेअंतर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगांकरिता कर्ज मर्यादा १०० लाख रुपये, सेवा उद्योग व कृषीपूर्वक उद्योगाकरिता कर्ज मर्यादा ५० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

अर्जदार स्थानिक रहिवासी व कोणतेही स्थायी उत्पन्न नसलेला असावा. वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेत अनुदान घेतलेले नसावे. केवळ नवीन उद्योजक, कारागीर, संस्था व बचतगट योजनेकरिता पात्र राहतील. १० लाखांवरील प्रकल्पासाठी व ५ लाखांवरील सेवा/कृषीपूरक उद्योगाकरिता अर्जदार किमान ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक. एका कुटुंबातील (पती-पत्नी) फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल.अर्ज करतेवेळी आधारकार्ड, शैक्षणिक दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, ग्रामसेवकाचा लोकसंख्येचा दाखला, प्रकल्प अहवाल व इंग्रजीतील अंडरटेकिंग फॉर्म, पॅन कार्ड, गुणपत्रिका, अर्जदाराचे छायाचित्र जोडावे.

इच्छुकांनी maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना KVIB एजन्सीची निवड करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय-२४ब, पुणे-मुंबई रस्ता, शासकीय दूध डेअरीसमोर, एस.टी. स्टॅण्ड शेजारी, खडकी येथे संपर्क साधावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×