Breking News
उत्सवांचे पावित्र्य जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण गरजेचे- रोहित टिळकपुण्यात दहीहंडी पाहणे महागात, तरुणांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन चोरीलाएसटीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, मित्र जखमीगौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरणातील सरकारी पक्षाची अनुपस्थिती गंभीर : डॉ. नीलम गोऱ्हेमहाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला बेड्याशाडू मातीपासून चिमुकल्यांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पाशंतनू गोखले यांच्या संतूरवादनाने रसिक मंत्रमुग्धकात्रजमधील मंदिरातून ५ लाखांचे दागिने चोरीससून रुग्णालयाजवळ तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेआवाज बंद कर डीजे, तुला पुणेकरांची शपथ हाय’

खरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

खरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

कृषी अधिकारी सचिन हाके यांचे आवाहन

marathinews24.com

बारामती – यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे अनिश्चित स्वरूप लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकांच्या चांगल्या उगवणीसाठी, पाण्याचा कार्यक्षम वापर व उत्पादनवाढीसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.

प्रकल्पांतील अडचणी दूर करून कामे गतिमान करा-मंत्री चंद्रकांत पाटील – सविस्तर बातमी 

रुंद सरी-वरंबा पद्धतीमध्ये साधारणपणे ९० ते १२० सेमी रुंदीचा वरंबा व १५ ते २० सें.मी. ची सरी तयार करून पेरणी केली जाते. या पद्धतीमुळे अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा जलद गतीने होतो. तसेच पावसात खंड पडल्यास सरींमध्ये साठलेल्या ओलाव्याचा पिकांना फायदा होतो. परिणामी मुळांची वाढ चांगली होऊन खतांचा कार्यक्षम वापर होतो व उत्पादनात वाढ होते.

सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, कापूस तसेच इतर खरीप पिकांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त मानली जाते. जमिनीतील ओलावा संवर्धन, मृदा धूप नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापनासाठीही ती प्रभावी ठरते. याशिवाय आंतरमशागत, खत व्यवस्थापन व तण नियंत्रणाची कामे सुलभ होतात. मात्र अतिशय कोरड्या जमिनीत या पद्धतीने पेरणी टाळावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली रुंद सरी-वरंबा यंत्राचा वापर करून पेरणी करावी. हे यंत्र अनुदानित दरात उपलब्ध असून त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येतो.

अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×