Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

कोंढव्यात तरुणाचा खुनाचा प्रयत्न, ६ जणांना अटक

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

सहा जणांना येवलेवाडी पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणाला दांडक्याने मारहाण करुन त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. टोळक्याने तीक्ष्ण शस्त्रे उगारून परिसरात दहशत माजविली. टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केली. तरुणाचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी सहा जणांना येवलेवाडी पोलिसांनी अटक केली.

बिबवेवाडीत तरुणाला मारहाण – सविस्तर बातमी

अविनाश मारुती दीक्षित (वय २०, रा. मरळ बिल्डिंग, भोलेनाथ चौक, कोंढवा बुद्रुक) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी चिक्या उर्फ विश्वजित भोसले (वय २१), साई उर्फ वक्या हौसमणी, आर्यन वाव्हळे, मंगेश उर्फ डुल्या सावंत, सोहम हुरळीकर, दर्शन वठार यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर तीन ते चार साथीदारां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते पसार झाले आहेत. याबाबत दीक्षित याने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षित याची आरोपींशी भांडणे झाले होती. मंगळवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास दीक्षित आणि त्याचा मित्र रिक्षात मोबाइलवर गेम खेळत होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांच्याकडे दांडके आणि शस्त्रे होती. टोळक्याने दीक्षित याला शिवीगाळ करुन दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. टोळक्याने दीक्षित आणि त्याच्या बरोबर असलेल्या मित्राला मारहाण केली. परिसरातील वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली, तसेच शस्त्रे उगारून नागरिकांना शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. पसार झालेल्या सहा जणांना अटक करण्यात आली असून, पसार झालेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज खराडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×