बिबवेवाडीतील घटना
marathinews24.com
पुणे – तरूणावर वार करून टोळक्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना २८ एप्रिलला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील भुत बंगला रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी प्रकाश सोनकांबळे (रा. अपर बिबवेवाडी ) याच्यासह इतर दोघा अनोळखीविरूद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक प्रकाश देवडा (वय २७, रा. त्रिमुर्तीनगर, बिबवेवाडी ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
मोलकरणीनेच मारला दागिन्यांवर डल्ला, महिला अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अशोक देवडा हे २८ एप्रिलला दीड वाजण्याच्या सुमारास भुत बंगला रस्त्यानजीक भावना ट्रेडर्समध्ये थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या तिघांनी अशोकला विनाकारण शिवीगाळ केली. काहीही कारण नसताना टोळक्याने त्यांना मारहाण करून वार केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पळापळ झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. हल्लेखोर आरोपी पसार असून, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी तरूणावर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कामथे तपास करीत आहेत.