Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटका

भीक मागण्यासाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

marathinews24.com

पुणे – भीक मागण्यासाठी कात्रज येथील वंडर सिटी झोपडपट्टीमधून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट ०२ च्या पथकाने तुळजापूर (धाराशिव) येथून सुखरूप सुटका केली. कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक करून भिक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दापाश केला आहे.

खराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फी; जाणीवपूर्वक बदनामी; एकनाथ खडसे यांचा आरोप – सविस्तर बातमी

सुनिल सिताराम भोसले (५१ वर्षे, धंदा मजुरी, रा. मोतीझारा, तुळजापुर, जिल्हा धाराशीव, शंकर उजन्या पवार (५० वर्षे) शालुबाई प्रकाश काळे (४५ वर्षे), गणेश बाबु पवार (३५ वर्षे, तिघेही रा. डिकमाळ, पारधी वस्ती, तुळजापुर, धाराशीव), तसेच मंगल हरफुल काळे, (१९ वर्षे, रा. रेंज हिल, खडकी रेल्वे लाईनझोपडपट्टी, खडकी) असे पोलिसांनि अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंडर सिटी झोपडपट्टीमधून दोन वर्षाची चिमूकलीला २५ जुलै रोजी रात्रीच्या कोणी तरी झोपेतुन उचलून पळवुन नेले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. चिमुकलीच्या शोधासाठी भारती विद्यापीठ पोलीसांची दोन टीम तयार केल्या होत्या. तसेच गुन्हे शाखेनेही तपास पथके तयार करुन कात्रज ते पुणे स्टेशन दरम्यानचे रोडवरील सर्व आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले केले. त्यामध्ये दोन पुरुष व एक महीला हे एका दुचाकी गाडीवरुन पिडीत मुलीस घेवुन पुणे रेल्वे स्टेशनकडे जात असल्याचे गिसून आले. पोलीसांनी पुणे रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी आरोपींसोबत आणखी दोन आरोपी असल्याचे दिसुन आले.

त्या ठिकाणावरुन आरोपींचे चेहरे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्व आरोपी धाराशीव जिल्ह्यातील तुळजापुर या ठिकाणी असल्याची माहीती भारती विद्यापीठ तपास पथक व गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोकाशी, पोलीस अंमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर पोलीस अंमलदार अशी दोन पथके तुळजापुरला पोहचले. तेथे स्थानिक धाराशिव एल सी बी पोलीसांच्या मदतीने कौशल्यपुर्ण पध्दतीने तपास करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांचेकडे कसुन चौकशी केल्यानंतर पिडीत २ वर्षाची चिमुकली सुखरुप असून भिक मागण्याकरता अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी पिडीत २ वर्षाची चिमुकली सुखरुप सुटका केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त निखील पिंगळे, उपायुक्त आयुक्त मिलींद मोहीते, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, सहायक पोलीस राहुल आवारे, यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, एपीआय आशिष कवठेकर, एपीआय अमोल रसाळ, एपीआय स्वप्नील पाटील, उपनिरीक्षक वैभव मगदुम, उपनिरीक्षक निलेश मोकाश, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, नवनाथ भोसले, निलेश खैरमोडे, जाधव, शंकर कुंभार, आबा मोकाशी, विजय पवार, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओम कुंभार, संतोष टकले, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, सद्दाम तांबोळी, शुभम देसाई, मयुर भोसले, निलेश साबळे, अमित जमदाडे, धाराशिव एल सी बी चे पोहवा समाधान वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×