Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

डेक्कन जिमखाना भागातील हाॅटेलसमोर तरुणाचा खुनाचा प्रयत्न

तरुणींसह तिघे अटकेत; टोळक्याविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – डेक्कन जिमखाना परिसरातील फ्लाईंग जिप्सी हाॅटेलसमोर तरुणाच्या डोक्यात शस्त्राने वार करुन त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या प्रकरणी दोन तरुणींसह साथीदाराला अटक करण्यात आली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड – सविस्तर बातमी

अथर्व प्रमोद जगताप (वय १९, रा. ऑरा सोसायटी, शिवसृष्टीजवळ, आंबेगाव) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी माधवी कुंभार (रा. काळेपडळ, हडपसर), स्नेहल सोनके (रा. पिंपळे गुरव), शार्दुल ओव्हाळ (रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या सात ते आठ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत जगताप याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी आणि फिर्यादी अथर्व जगताप हे ओळखीचे आहेत. सातारा येथे त्यांची काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. शनिवारी (१५ ऑगस्ट) पहाटे सव्वातीनच्या सुमारास अथर्व हा फ्लाईंग जिप्सी हाॅटेलमधून बाहेर पडत होता. त्या वेळी टोळक्याने अथर्वला अडवले. ‘तू तरुणींना काय बोलला. आमच्याबरोबर चल तुला दाखवितो’, अशी धमकी दिली. अथर्व घाबरून हाॅटेलमध्ये पळाला. त्या वेळी आरोपी तरुणी आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ केली. ‘याला मारा, जिवंत सोडू नका’, अशी धमकी देऊन त्याच्या डोक्यात शस्त्राने वार केला. हाॅटेलमधील खुर्ची त्याला फेकून मारली, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डेक्कन जिमखाना भागातील शिरोळे रस्त्यावर असलेले हाॅटेल मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याने यापूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती. संबंधित हाॅटेल मालकाविरुद्ध कारवाई केली होती. या हाॅटेलच्या परिसरात यापूर्वी मारामारीच्या घटना घडल्या होत्या. रात्री अपरात्री तरुणांचा आवाजामुळे, गोंधळामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×