Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड

पुण्यातील बालसुधारगृहातून पळालेला अल्पवयीन ताब्यात

खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – परदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने खडकी रेल्वे स्थानक परिसरात पकडले. या प्रकरणात सराइताच्या साथीदाराला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल, सहा काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी वीर श्याम दलगज (वय २२, रा. पारसी चाळ, देहूरोड), सार्थक शिवनागी वाघलगवे (वय २२, रा. पिंपरी) यांना अटक करण्यात आली. दलगजविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

लक्ष्मी रस्त्यावरील सराफी पेढीतून अंगठी चोरीला – सविस्तर बातमी

लोहमार्ग पोलिसांचे पथक ११ ऑगस्टला खडकी रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी दलगज हा फलाट क्रमांक एक परिसरात थांबला होता. अंधारात थांबलेल्या दलगज याला पोलिसांना पाहिले. पोलिसांना पाहताच तो पसार झाला. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे परदेशी बनावटीचे पिस्तूल, तसेच सहा काडतुसे सापडली. पिस्तुलाबाबत पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा साथीदार वाघलगवेने पिस्तूल दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाघलगवे याला ताब्यात घेतले. परदेशी बनावटीचे पिस्तूल कुठून आणले, तसेच त्यांना कोणी दिले, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

लोहमार्ग पोलीस अधीक्षक डाॅ. राजकुमार शिंदे, अतिरिक्त अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय अधिकारी अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सीताराम फंड, उपनिरीक्षक शंभू रणवरे, यशवंत साळुंखे, अमरदीप साळुंखे, इम्तियाज आवटी, धीरज कपिले, प्रशांत डोईफोडे, अमोल शेळके, अमोल कोकणे, सागर शेंडकर, गणेश बच्छाव यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×