Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

संविधानाशी सुसंगत बाबासाहेब शिंदे यांचे कार्य : डॉ. श्रीपाल सबनीस

सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सत्कार

marathinews24.com

पुणे – भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानवकेंद्रीत आहेत. माणूसपण आणि सेवेतून समर्पण या भावनेतून बाबासाहेब शिंदे संविधानाशी सुसंगत भूमिका घेऊन समाजकार्य करीत आहेत, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.

प्रामाणिक कार्यकर्त्याची आज समाजाला गरज – दिलीप कांबळे – सविस्तर बातमी

मनोहर कोलते मैत्र संघ, पुणे, नवरत्न ओल्ड एज होम आणि स्नेहछाया परिवार बालकाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 3) महावितरणमधील प्रधान यंत्रचालक बाबासाहेब शिंदे यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महावितरण मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार, मनोहर कोलते, आर. टी. देवकांत, अनिता राकडे, दत्तात्रय इंगळे मंचावर होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगत्‌‍गुरू संत तुकाराम महाराज यांची पगडी, शाल देऊन शिंदे यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. सबनीस पुढे म्हणाले, शिंदे यांची भूमिका संघर्षाची असली तरी विचार संवादी आहेत. संवेदनेमुळे बोलण्यात आलेले कौशल्य अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले आहे. त्यांच्या सेवाकार्याची साक्ष अनेक उदाहरणांमधून दिसून येत आहे.

राजेंद्र पवार म्हणाले, शिंदे यांनी मैत्रीभाव जपत सहकारी, मित्रांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्यातील विनम्रता हा सहकारी आणि मित्रांमधील खरा दुवा आहे.

पुस्तकांची उपयुक्तता लक्षात घेऊन ज्या शाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले अशा शाळांना, नवरत्न वृद्धाश्रम, स्नेहछाया बालकाश्रमास पुस्तके भेद दिली. वाचनातून मनुष्य घडत जातो त्यामुळे विविध संस्था, शाळांना पुस्तके भेट देत असल्याचे बाबासाहेब शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. आर. टी. देवकांत यांनी मनोगत व्यक्त केले.

सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मनोहर कोलते म्हणाले, शिंदे यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेतली जावी या उद्देशाने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेब शिंदे यांच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत थेटे यांनी केले.

फोटो ओळ : मनोहर कोलते मैत्र संघ, पुणे आयोजित सत्कार सोहळ्यात (डावीकडून) आर. टी. देवकांत, अनिता राकडे, सौ. शिंदे, बाबासाहेब शिंदे, डॉ. श्रीपाल सबनीस, राजेंद्र पवार, मनोहर कोलते.

प्रति,
मा. संपादक
मनोहर कोलते मैत्र संघ, पुणेतर्फे महावितरणमधील प्रधान यंत्रचालक बाबासाहेब शिंदे यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल आज (दि. 3) सत्कार करण्यात आला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
मनोहर कोलते, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×