Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Baramati Double Murder : तमाशाचा नाद, व्यसनासाठी चोरी अन दोघींचा खून

Baramati Double Murder : तमाशाचा नाद, व्यसनासाठी चोरी अन दोघींचा खून

बारामतीतील दुहेरी हत्याकांडाची उकल, आरोपीला बेड्या

marathinews24.com

पुणे – Baramati Double Murder : व्यसन करण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी आरोपीने थेट भावकीतील घरातच डल्ला मारला. त्यासाठी त्याने झोपेतील दोन जेष्ठ महिलांच्या गळ्यावर कुर्‍हाड चालवली. त्यानंतर मृत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरुन हल्लेखोर पसार झाला होता. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीला नशा करण्यासह तमाशाचा छंद असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आमचे पोलीस दल सदैव कटिबद्ध असल्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यवत परिसरात गांजा तस्करीचा पर्दाफाश – सविस्तर बातमी 

विकास ऊर्फ अप्पा राजेंद्र लडकत (वय २५, रा. शेरोवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. इंदुमती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ५५) अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत. हत्येची घटना २९ सप्टेंबरला सुपा बारामती हद्दीतील शेरेचीवाडी या ठिकाणी घडली होती. याप्रकरणी गणेश मारुती लडकत वय ४५ यांनी सुपा ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, दुहेरी हत्याकांडामुळे संपुर्ण जिल्ह्याभरात दहशत निर्माण झाली होती. Baramati Double Murder त्यासोबतच राजकीय नेते मंडळींकडून आरोप-प्रत्योरोप करण्यात आले होते. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, चोरीचे दागिने जप्त केले आहेत.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल म्हणाले, घरात झोपलेल्या दोन महिलांच्या हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाला दिशा दिली. याचा तपास करण्यासाठी ८ पथके तयार करण्यात आली होती. घटनास्थळासह आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, कोल्हापूर, निपाणी, कर्नाटकमध्ये जाउन तब्बल २०० हून अधिक रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली. त्यासोबतच आरोपी स्थानिक आहे काय, यादृष्टीने आजूबाजूच्या घरावरही लक्ष केंद्रीत केले होते. त्यानुसार शेरेवाडी गावातील एकाच्या हालचाली संशयास्पद असल्याचं दिसून आल्या. पथकाने विकास उर्फ अप्पा लडकत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे घटनेच्या दिवसापासून ते दुसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत वावरण्याची माहिती घेण्यात आली.

आरोपी विकास लडकत याने खूनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. मीच सोन्याचे दागिने चोरुन आमच्या भावकीतील दोन्ही महिलांचा कुर्‍हाडीने खून केल्याची कबुली दिली. ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक शैलेश चिवडशेट्टी, एपीआय शशिकांत शेळके, एपीआय महादेव शेलार, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, उपनिरीक्षक युवराज धोंडे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राउत, उपनिरीक्षक बाळासाहेब कांरडे, उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, उदय पवार, कदम, शिवाजी निकम, सचिन घाडगे, नीलेश शिंदे, गुरुनाथ गायकवाड, अक्षय नवले यांनी केली.

आरोपीला व्यसन अन तमाशाचा नाद

Baramati Double Murder आरोपी विकास लडकत हा महिलांच्या दुहेरी हत्याकांडातील भावकीतला आहे. त्याला व्यसनासह तमाशाचा नाद होता. त्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी त्याने संबंधित ठिकाणी चोरी करण्याचे ठरवले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याने चोरीसाठी दोन्ही महिलांच्या गळ्यावर कुर्‍हाडीने वार करून खून केला. त्यानंतर आरोपी काही वेळ बाहेर गेला होता. थोड्या वेळ्याने त्याने घरात येउन मृत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरुन पलायन केले. दरम्यान, या खूनाच्या घटनेमुळे राजकीय टीकेच्या पैâरी झाडून पोलिसांवर टीका झाली होती.

जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेच्या अनुषंगाने पोलीस दल सदैव दक्ष असून, प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. शेरेचीवाडी गावातील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला असून, आरोपीने चोरीसाठी दोन जेष्ठ महिलांच्या गळ्यावर कुर्‍हाडीने वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×