४१ किलो गांजा जप्त; दोघांना अटक
marathinews24.com
पुणे – Yavat Ganja Smuggling : मोटारीतून गांजाची तस्करी करणार्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४१ किलो गांजा, मोटार असा २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हर्षवर्धन अशोक बरडे (वय २९, रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. रायगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि कुशल दत्तात्रय बिनवडे (वय ३०, रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. वंजारवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फुरसुंगीत तोतया डॉक्टर गजाआड – सविस्तर बातमी
जिल्ह्यात अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री व वाहतूक करणार्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर ४ ऑक्टोबरली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राउत यांना दोघा गांजा तस्करांची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून हर्षवर्धन बरडे आणि कुशल बिनवडे यांना मोटारीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ किलो गांजा जप्त केला. Yavat Ganja Smuggling ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, एपीआय गाढवे, उपनिरीक्षक वाघज, उपनिरीक्षक मित्तलवाड, सचिन घाडगे, आसिफ शेख, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे, मेघरज जगताप, प्रतीक जगताप, मोहन भानुसे, दिवार यांनी केली.
अमली पदार्थांच्या तस्करीची माहिती द्या
नागरिकांना आपल्या परिसरात होणार्या अमली पदार्थांच्या तस्करींची माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी केले आहे. दरम्यान, युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यादृष्टीने अमली पदार्थ तस्करी विरोधात जिल्ह्याभरात कारवाईची मोहिम हाती घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.























