६४६ नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचार
marathinews24.com
बारामती – श्रीगणेशा आरोग्याचा अभियान २०२६ अंतर्गत बारामती तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय (Baramati Health Camp) यांच्यावतीने आयोजित शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून उपलब्ध आरोग्य सेवांचा नियमित लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ.अंजली पाटील यांनी केले.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा रूट मार्च – सविस्तर बातमी
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे तसेच नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे श्रीमती पाटील यांनी सांगितले.
अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय, रूई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र, मुर्टी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, लासुर्णे येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. (Baramati Health Camp) या चारही आरोग्य शिबिरांमध्ये एकूण ६४६ नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. विविध आजारांचे लवकर निदान, उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. राजेश लाकडे व डॉ. निखिल भराड यांनी वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच संबंधित आरोग्य यंत्रणेच्या सहकार्याने शिबिरांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी केली.




















