Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण मोहीमेअंतर्गत साडेसात हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत बारामतीत पर्यावरण संवर्धनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुढाकार

marathinews24.com

बारामती – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग, पुणे यांच्यावतीने ‘हरित महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत तालुक्यात साडेसात हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला; त्याचा शुभांरभ अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस उपमुख्यालय बऱ्हाणपूर येथे करण्यात आला.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा २३ व २४ जुलै रोजी पुणे दौरा – सविस्तर बातमी

या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षण, हवामान बदलाचा सामना करणे आणि तालुक्यातील हरित क्षेत्र वाढवणे हा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध रस्ते, बांधकाम स्थळे, महामार्गाकडेच्या जागा, सरकारी इमारतींचा परिसरात आणि उपलब्ध खुल्या जागी ही झाडे लावण्यात आली.

यावेळी कार्यकारी अभियंता अमोल पवार यांनी सांगितले, बारामती तालुक्यात 7 हजार 500 झाडांच्या लागवडीद्वारे हरित महाराष्ट्राच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये देशी प्रजाती जसे कडूनींब, पिंपळ, वड, करंज, शिसम, बाभूळ, आंबा, जांभूळ इत्यादी झाडे लावण्यात आली आहेत. या उपक्रमाद्वारे झाडे लावण्यासोबतच त्यांचे संरक्षण आणि देखभाल यासाठी देखील यंत्रणा उभारण्यात आली आहे.

कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×