Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

बारामतीत अटकावलेल्या बेवारस वाहनांचा होणार जाहीर लिलाव

सात दिवसांत मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याचे परिवहन कार्यालयाचे आवाहन

marathinews24.com

बारामती – बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने मोटार वाहन कर कायद्यान्वये जप्त करण्यात आलेली तसेच विविध कारणांमुळे कार्यालयाच्या आवारात अटकावून ठेवण्यात आलेली बेवारस वाहने व वाहनांचे सुटे भाग यांचा भंगार म्हणून जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.

दिवाळी फराळाचे पदार्थ परदेशात पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज – सविस्तर बातमी

जप्त केलेली वाहने तसेच विविध कारणांमुळे अटकावून ठेवलेली वाहने कार्यालयाच्या परिवहन कार्यालयाच्या आवारात उभी आहेत. या वाहनांमध्ये काही वाहनांची अवस्था खराब झाली असून, ती वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत. काही वाहनांमधून पेट्रोल व डिझेलची गळती होऊन आग लागण्यासारख्या दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने ही वाहने भंगार म्हणून लिलावात काढण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, संबंधित वाहनांचे मालक, व्यक्ती, संस्था अथवा मालकी हक्क सांगणाऱ्यांनी वाहनांबाबतचे आवश्यक पुरावे व कागदपत्रांसह ७ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×