Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Diwali Faral Parcel Abroad : दिवाळी फराळाचे पदार्थ परदेशात पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज

पोस्टमन घरी येऊन घेऊन जाणार फराळाचे पार्सल; टपाल विभागाचा अभिनव उपक्रम

marathinews24.com

बारामती – परदेशातील नातेवाईकांना दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेता यावा यासाठी टपाल विभाग सज्ज असून बारामती टपाल विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित फराळाचे पदार्थ माफक दरात परदेशात पाठविण्याची पार्सल सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

नानामहाराज मंडलिक जयंतीनिमित्त २५ शेतकरी कुटुंबांना ६.२५ लाखांची मदत – सविस्तर बातमी

आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून टपाल कार्यालयामध्ये येऊ शकत नाहीत अशा नागरिकांसाठी घरी येऊन फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पोस्टमन घरी येऊन फराळाच्या पदार्थांचे पार्सल विनामूल्य घेऊन जातील.

नोकरी आणि शिक्षणानिमित्त बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, शिरूर येथून परदेशामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परदेशामध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येकालाच दिवाळीच्या सणासाठी भारतामध्ये आणि आपल्या घरी येणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन जगभरातील प्रियजनांना फराळाचे पदार्थ आणि भेटवस्तू पाठवून त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बारामती टपाल विभागाने हे पार्सल परदेशात पोहोचविण्याची सुविधा दिली आहे.

या सेवेचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी ९०९६५४४९९९ , ९९६०५८८६९९, ८००७७९७५९५, ७५८८२३०२७०, ९१३०९६२८२७ या क्रमांकावर सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन बारामती विभागाचे डाक अधीक्षक केतन शित्रे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×