Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Nana Maharaj Mandalik Jayant i: नानामहाराज मंडलिक जयंतीनिमित्त २५ शेतकरी कुटुंबांना ६.२५ लाखांची मदत

Nana Maharaj Mandalik Jayanti

धर्मादाय सहआयुक्त दिनेश कोठळीकर यांचे आवाहन; शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहावे

marathinews24.com

पुणे – Nana Maharaj Mandalik Jayanti: सद्गुरू परमपूज्य सिद्ध श्री नानामहाराज मंडलिक यांच्या जयंतीनिमित्त श्री शिव गोरक्ष आश्रम ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. या उपक्रमांतर्गत २५ कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचे धनादेश आश्रमाचे अध्यक्ष किशोर (दादा ) मंडलिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आंबेगाव बुद्रुक येथील सनब्राइट स्कूलशेजारील आश्रम परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मादाय सहआयुक्त दिनेश कोठळीकर होते.तर अभिजित अनाप साहेब – अधीक्षक तथा माहिती अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच हवा; शिवसेना पुरस्कृत उमेदवाराच्या प्रचारार्थ पदाधिकाऱ्यांची चर्चा – सविस्तर बातमी 

चंद्रसेन जाधव, आल्हाद पासलकर, नरेंद्र दिक्षित, रमेश पायगुडे, गिरीश मंडलिक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. दिनेश कोठलीकर म्हणाले, “शेतकरी आत्महत्या हा गंभीर सामाजिक प्रश्न आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येणे ही काळाची गरज आहे. श्री शिव गोरक्ष आश्रम ट्रस्टचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, या सामाजिक कार्याला प्रसिद्धी देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे मी आभार मानतो. आश्रमाच्या वतीने यापूर्वी दुष्काळग्रस्त भागांत चारा वाटप, धान्य वाटप आणि विविध सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे.

ओंकार मंडलिक यांनी आवाहन केले की, “शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदतीसोबतच मानसिक आधार देणे महत्त्वाचे आहे. (Nana Maharaj Mandalik Jayanti) समाज म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत , हा विश्वास त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा प्रयत्न आहे. समाजातील सर्व घटकांनी संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शक्य ती मदत करावी.” या कार्यक्रमाप्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा आणि आजी माजी शासकीय अधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गायत्री मंडलिक मोहाडीकर यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×