कल्याणीनगरमध्ये अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकीला धडक

marathinews24.com

पुणे – दुचाकीस्वाराच्या बेदरकारपणामुळे दुसऱ्या दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने दुचाकीस्वार वडील आणि सहप्रवासी मुलीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच कल्याणीनगर भागात घडली. मच्छिंद्र मोरे (वय ५५ ,रा. समता सोसायटी, वडगाव शेरी, मूळ रा. पोकुर्ले, ता. महाड, जि. रायगड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी कोमल मच्छिंद्र मोरे (वय २८) जखमी झाली. याप्रकरणी एका दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मच्छिंद्र मोरे यांची मुलगी रिना (वय २६) हिने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मेट्रोच्या बांधकामासाठी साहित्य पुरविण्याच्या आमिष दाखवून फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मच्छिंद्र मोरे आणि त्यांची मुलगी कोमल हे ३ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास कल्याणीनगर भागातून निघाले होते. त्या वेळी बिशप स्कूल परिसरातील रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने दुचाकीस्वार मोरे यांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार मच्छिंद्र मोरे आणि त्यांची मुलगी कोमल हे जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता दुचाकीस्वार पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या मच्छिंद्र आणि त्यांची मुलगी कोमल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान मच्छिंद्र यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड तपास करत आहेत.

वाहतूक पोलिसांनी बेशिस्त दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. विरुद्ध दिशेन येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या बेदरकारपणामुळे गंभीर अपघात घडले आहेत. पोलिसांनी विरुद्ध दिसेने जाणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्या दुचाकी ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी ट्रिपल सीट जाणाऱ्या १५ हजारांहून जास्त दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून एक कोटी रुपये ४८ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×