Breking News
कारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यूकात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यूवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनफुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्लापंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

मेट्रोच्या बांधकामासाठी साहित्य पुरविण्याच्या आमिष दाखवून फसवणूक

मेट्रोच्या बांधकामासाठी साहित्य पुरविण्याच्या आमिष

तब्बल पावणेचार कोटींची फसवणूक

marathinews24.com

पुणे – मेट्रोच्या बांधकामसाठी सिमेंट, तसेच पोलाद पुरविण्याच्या आमिषाने दाम्पत्याची पावणेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सुरेश काकडे (रा. स्वप्नपूर्ती पार्क, राहिंज वस्ती, लोणी काळभोर), अतुल शामराव पवार (रा. खिलारेवाडी, एरंडवणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या महाितीनुसार, तक्रारदार ४२ वर्षीय महिला मांजरी भागात राहायला आहेत. महिलेची २०२० मध्ये आरोपींशी ओळख झाली होती. महिला आणि तिच्या पतीला आरोपींनी मेट्रोला मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्याची गरज आहे. पोलाद आणि सिमेंट पुरविण्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतवा मिळेल, असे आमिष आरोपींनी दाखविले. त्यानंतर तक्रारदार महिला आणि तिच्या पतीने वेळोवेळी आरोपींना तोन कोटी ७८ लाख रुपये दिले. मात्र, त्यांना परतावा देण्यात आला नाही. महिलेने त्यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा आरोपींनी सावकारीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांना शिवीगाळ केली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×