Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यात बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा

पुण्यात बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा

कर्णकर्कश सायलेन्सरवर चालवला बुलडोझर

marathinews24.com

पुणे – फटाक्यासारखे आवाज काढणारे सायलेन्सर बसवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या २ हजार ८२२ वाहन चालकांवर कारवाई केली. पोलिसांनी बुलेटला बसविलेले ९०० सायलेन्सर काढून टाकले. येरवड्यातील वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात बुधवारी ९०० सायलेन्सरवर बुलडोझर चालविण्यात आला.

पुण्यात होळीच्या दिवशी ४५५ मद्यपी वाहन चालक जाळ्यात – सविस्तर बातमी 

‘शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बुलेटला फटाक्यासारखा आवाज काढणारे सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज काढला जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालय, रुग्णालयाच्या परिसरात अशा प्रकारचे आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास व्हायचा. वाहतूक पोलिसांकडे याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कर्णकर्कश हाॅर्नचा वापर करणारे दुचाकीस्वार, तसेच फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई केली,’ अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव उपस्थित होते.

‘मोहिमेत पोलिसांनी एकूण २ हजार ८२२ चालकांविरुद्ध कारवाई केली. बुलेटला बसविण्यात आलेले सायलेन्सर (माॅडीफाय) जागेवरच जप्त करण्यात आले. कारवाईत २८ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, डेक्कन जिमखाना, भारती विद्यापीठ भागात अशा प्रकारचे सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारचा पहिला गुन्हा केल्यास त्यांच्याकडून एक हजार रुपये दंड आकारला आहे. पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा केल्यास दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात बुलडोझर चालवून जप्त केलेले सायलेन्सर नष्ट करण्यात आले,’ असे अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी नमूद केले. सायलेन्सरमध्ये फेरफार करून देणाऱ्या गॅरेजचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. अशा गॅरेजचालकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला.

फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या सायलेन्सरचा, तसेच कर्कश हाॅर्नचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध यापुढील काळात नियमित कारवाई करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे.

– मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×