पुण्यात होळीच्या दिवशी ४५५ मद्यपी वाहन चालक जाळ्यात

पुण्यात होळीच्या दिवशी ४५५ मद्यपी वाहन चालक जाळ्यात

पोलिसांनी विशेष मोहीम राबवून केली कारवाई

marathinews24.com

पुणे – होळी, तसेच धुळवडीच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या दुचाकीस्वार, तसेच मोटार चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी नाकाबंदी करून विशेष कारवाई (ड्रंक अँड ड्राइव्ह) केली. मोटार वाहन कायद्यान्वये ४५५ मद्यपी वाहन चालकांवर खटले दाखल करण्यात आले. होळी, धुळवडीला शहराच्या विविध भागात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अनेक जण मद्य प्राशन करून वाहन चालवितात. मद्यपी चालकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून नाकाबंदी केली होती.

प्रशासकीय भवन येथे स्वच्छता मोहिम संपन्न – सविस्तर बातमी 

शहरातील प्रमुख चौक, महामार्ग, तसेच गर्दीच्या ३० ठिकाणी मंगळवारी (३ फेब्रुवारी) नाकाबंदी केली. लोखंडी कठडे लावून (बॅरिकेड्स) तपासणी केली. ब्रीथ अनालायजर यंत्राच्या साहाय्याने वाहन चालकांची तपासणी केली. तपासणीत ४५५ चालकांनी मद्य प्राशन केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

मद्यप्राशन केलेल्या चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांना बुधवारी (४ फेब्रुवारी) येरवडा येथील वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात बोलाविण्यात आले. वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केले. मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या दृष्टीने न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव्र केली. गेल्या वर्षी शहरात ५ हजारांहून जास्त मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. यापुढील काळात मद्यपी वाहनचालकांविरुद्ध नियमित कारवाई करण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×