Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

शिबारात ३२१ रक्तपिशव्यांचे संकलन

marathinews24.com

बारामती – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे २८ व २९ मे २०२६ या कालावधीत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

या शिबारात एकूण ३२१ रक्तपिशव्यांचे संकलन झाले असून ते विविध गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे तसेच रक्तदानाचा सामाजिक संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात हा उपक्रम उपयुक्त ठरणारा आहे.

रक्तदान हे श्रेष्ठ समाजसेवेचे कार्य असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. विशेषतः या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविला.

शिबिराच्या आयोजनासाठी उपअधिष्ठाता डॉ. प्रज्ञा भालेराव, शरीरविकृती शास्र विभागप्रमुख डॉ. नकाते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश उमप, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांच्यासह कर्मचारी वर्गाने योगदान दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×