Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात बॉम्ब ठेवल्याची बोंबाबोंब…

संघाच्या कार्यालयासह महापौर कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा

marathinews24.com

पुणे – शहरातील महापालिका महापौर कार्यालयासह मोती बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा ई-मेल बुधवारी (दि. १०) महापौरांच्या मेलआयडीवर आल्यामुळे खळबळ उडाली होती. संबंधित इ मेलनंतर महापालिकेसह संघ कार्यालय आणि कौन्सिल हाॅल परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, याबाबत पुणे पोलिसांना समजताच बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ठिकाणांची तपासणी केली. मात्र, काहीही आढळून न आल्याने ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

हातभट्टी दारू रोखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या अधिकृत ई-मेलसह महापौरांच्या मेलवर महापौर कार्यालय, विधान भवन आणि मोती बागेतील संघाच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याबाबत धमकीचा ई-मेल बुधवारी सकाळी ८ वाजून २१ मिनिटांनी आला. हा ई-मेल कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बघितला. त्यानंतर १० वाजून ३५ मिनिटांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याला याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांना बॉम्बची माहिती मिळताच १० वाजून ४० मिनिटांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण केले.

पुणे महानगरपालिका, नवीन इमारत, महापौर कार्यालय येथे तात्काळ बंदोबस्त लावण्यात आला. १० वाजून ५४ मिनिटांनी बीडीडीएस पथक महापौर कार्यालयात पोहोचले. दुपारी सव्वा वाजेपर्यंत बीडीडीएस पथकाने महापौर कार्यालय व पुणे महानगरपालिकेच्या संपूर्ण इमारतीची सखोल तपासणी केली. बॉम्ब सदृश किंवा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. याशिवाय मोती बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आणि कौन्सिल हाॅल येथेही तपासणी केली. तेथेही काही संशयास्पद आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे २ पोलिस निरीक्षक, २ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २८ पोलिस अंमलदार, आरसीपी-१ पथक असा बंदोबस्त नेमला होता. पुणे महानगरपालिकेचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचा स्टाफ घटनास्थळी उपस्थित होता. आलेल्या ई-मेलचा स्रोत व आयपी ॲड्रेस शोधण्यासाठी सायबर पोलिस ठाण्यामार्फत तांत्रिक तपास सुरू केला असून, अफवा पसरवल्याप्रकरणी कायदेशीर कार्यवाही देखील केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×