Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

‘पत्नी मोलकरीण नाही’ या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

मेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सन्मान, समानता आणि स्वातंत्र्याला न्याय देणारा निर्णय-डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – पत्नीने स्वयंपाक, साफसफाई किंवा घरातील इतर कामे करण्यास नकार दिला म्हणून ती वैवाहिक कायद्यानुसार क्रूर ठरत नाही, तसेच पत्नी ही घरकामासाठी ठेवलेली मोलकरीण नसून तिच्या सन्मानाचा आदर राखला गेला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आमदार व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले आहे.

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दिलेल्या या निर्णयाबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी त्यांना अभिनंदनपर पत्र पाठविले आहे. महिलांच्या सन्मान, समानता आणि स्वातंत्र्याला न्याय देणारा हा निर्णय अनेक महिलांना दिलासा देणारा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

आजच्या काळातील कामकाजी महिलांच्या वास्तवाचा विचार करून न्यायालयाने घेतलेली भूमिका संवेदनशील आणि दिशादर्शक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले. पत्नी ही केवळ घरकामासाठी नसून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वातंत्र्याचाही आदर झाला पाहिजे, हा महत्त्वाचा संदेश या निर्णयातून समाजाला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना नेत्या, विधानपरिषद सदस्या व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा, या नात्याने न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल दोन्ही न्यायमूर्तींचे आपण मनःपूर्वक अभिनंदन करत असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×